बीड

बँकेच्या कर्जाला कंटाळून जिल्हा परिषद शिक्षकाने घेतला गळफास!

By Keshav Kadam

February 14, 2023

echo adrotate_group(3);

धारुर तालुक्यातील आसरडोह येथील घटना धारुर : दि.14 : एका खाजगी बँकेचे जिल्हा परिषद शिक्षकाकडे कर्ज होते. हे कर्ज थकीत झाल्यामुळे शिक्षकास बँकेची पोस्टमनद्वारे नोटीस आली. नोटीस मिळताच आलेल्या नैराश्यातून शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.14) धारुर तालुक्यातील आसरडोह येथे घडली. echo adrotate_group(6);

echo adrotate_group(8);

नितीन लक्ष्मण पाटोळे (वय 34 रा.आसरडोह, धारुर) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोडखा या शाळेवर पाटोळे हे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांनी एका खाजगी बँकेकडून कर्ज घेतले होते. त्याचे काही हाप्ते थकल्याने त्यांना पोस्टमनद्वारे नोटीस मिळाली. आलेल्या नैराश्यातून आसरडोह येथील तलावा शेजारील लिंबाचे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी धारुर ठाण्यातील पोह.सचिन सिद्धेश्वर यांनी भेट देत पंचनामा केला. मयत शिक्षक यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी दोन मुली असा मोठा परीवार आहे. सचिन सिध्देश्वर हे घटनास्थळी पोहचले. बँक प्रशासनाच्या तगाद्यामुळेच पाटोळे यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी म्हटले, या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याच पवित्रा घेतला. या प्रकरणी मंगल पाटोळे यांच्या फिर्यादीवरुन धारुर पोलीस ठाण्यात ओमकार काटकर, प्रशांत सोळंके, संस्थाचालक रवींद्र कानडे, रामेश्वर कानडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.echo adrotate_group(9); echo adrotate_group(10);