देश विदेश

अखेर धनुष्यबाणाचा निर्णय झाला!

By Keshav Kadam

February 17, 2023

बीड दि.17 : मागील काही दिवसापासून धणुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार हा वाद न्यायालयात सुरु होता. अखेर या प्रकरणाचा निकाल लागला असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला हे चिन्ह मिळालेलं आहे. तसेच शिवसेना हे नावही शिंदे गटाला मिळाले आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर खर्‍या अर्थाने केंद्रीय निवडणू आयोगाने हा निर्णय देवून न्याय दिला आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद या निकालाने आमच्या सोबत असल्याचे स्पष्ट झाले असल्याची अशी प्रतिक्रीया शिंदेगटाचे शंभूराज देसाई यांनी दिली आहे. एएनआयने याबाबतचं वृत्त दिले आहे.