क्राईम

कार्टून पाहताना मोबाईलचा स्फोट; मुलाची बोटे तुटली

By Shubham Khade

February 19, 2023

अचानक बॅटरीचा स्फोट; डोळ्यांनाही इजा

बीड : मोबाईलचा वापर हा लहान मुलांसाठी धोकादायक ठरत आहे. गुजरातच्या भचाऊ जिल्ह्यातील तिंडलवा गावात मोबाईलचा अचानक स्फोट झाला. यात मोबाईलवर कार्टून पाहत असताना 11 वर्षीय मुलाच्या बोटांना गंभीर जखम झाली. याशिवाय त्याच्या डोळ्यांनाही गंभीर इजा झाली. तसेच, अंगठ्यासह 3 बोटे फुटली आहेत.

रापर तालुक्यातील मोटा तिंडलवा गावातील शेतमजूर कनुभा जडेजा यांचा 11 वर्षीय मुलगा शक्तीसिंह मोबाईल घेऊन आपल्या घरी जात होता. अचानक या मोबाईलच्या बॅटरीत स्फोट झाला. त्यात मुलाच्या उजव्या हाताच्या अंगठ्यासह 3 बोटे फुटली. यामुळे ती कापून वेगळी करावी लागली. या घटनेनंतर मुलाला तातडीने सांखियाली स्थित मातृस्पर्ष रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टर विवेक यांनी निशिता व नर्सिंग स्टाफच्या मदतीने मुलावर तत्काळ उपचार सुरू केले. मुलाच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती पाहता त्यांनी प्रथमोपचाराच्या जागी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सलग 2 तास ऑपरेशन करून मुलाचा हात सुरक्षित केला.