प्रतिनिधी । पुणे दि.26 : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा कलाकार गौतमी पाटील goutami patil हिची आक्षेपार्ह ध्वनीचित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित करून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गौतमी पाटील एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना तिची कोणीतरी चोरुन ध्वनीचित्रफित तयार केली. त्यानंतर समाजमाध्यमावर संबंधित ध्वनीचित्रफित प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर पुणे विमानतळ पोलिसांनी अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती रविवारी पोलिसांकडून देण्यात आली आहे.याबाबत एका 32 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात आज्ञता विरोधात फिर्याद दाखल केली आहे. लावणी कलाकार गौतमी पाटील एका कार्यक्रमात तिचे कपडे बदलत असताना, तिचा पाठलाग करत असलेल्या अज्ञाताने मोबाइल कॅमेर्यावरुन तिची आक्षेपार्ह ध्वनीचित्रफित काढली. त्यानंतर संबंधित आरोपीने समाजमाध्यमावरील दोन खात्यातून ध्वनीचित्रफित प्रसारित करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. तक्रारदार महिला आणि सहकार्यांची अशाप्रकारे अश्लील ध्वनीचित्रफित प्रसारित करण्याची धमकी समाजमाध्यमातून देण्यात आली होती. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही.लहाने पुढील तपास करत आहे.
रुपाली चाकणकर यांच्याकडून गंभीर दखलदरम्यान पुण्यातील एका शो दरम्यान गौतमी पाटीलचा कपडे बदलताना चोरून व्हीडिओ करण्यात आला. यातून गौतमी पाटील हीची प्रतिमा मलिन करण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे. गौतमी पाटील यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राज्याच्या सायबर पोलीस महानिरीक्षकांना महत्वाचे आदेश दिले आहेत. महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरीता थेट कृती कार्यक्रम तयार करा, असे म्हटले आहे.