जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांची बीड जिल्हा रुग्णालयाला सरप्राईज व्हीजीट

बीड

बीड, दि.1 : बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे dipa mudhol munde यांनी बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयाला ‘सरप्राईज व्हीजीट’ दिली. यावेळी त्यांना रुग्णालयात अनेक चांगल्या सोई सुविधा उपलब्ध, स्वच्छता असल्याचे दिसून आले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्याकडून रुग्णालयाची माहिती घेताना जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ या जिल्हा रुग्णालयात आल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी तातडीने वॉर्डात धाव घेत त्यांना रुग्णालयाची माहिती करून दिली. मुधोळ यांनी प्रसुती वॉर्ड, आयसीयू, जनरल वॉर्ड, आयुष विभाग, डायलीसीस विभाग, ऑपरेशन थिअटर, अतिदक्षता विभाग, इनबॉर्न विभागात भेटी देऊन तेथील सोई-सुविधांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी नातेवाईकांना काही अडचणी आहेत का याबाबत विचारपूस केली. वॉर्डात पाणी, जेवण, इतर कुठल्या अडचणी असतील तर माझ्याशी बोला असे म्हणत नातेवाईकांशी संवाद केला. मात्र सर्वांनीच जिल्हा रुग्णालयात चांगल्या सोई सुविधा असल्याचे सांगितले.

जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन त्यांनी माहिती घेतली.
महिला रुग्णांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे
महिला रुग्णांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे
जिल्हा रुग्णालयातील आयुष कक्षात जाऊन त्यांनी औषधोपचारांची माहिती घेतली.
पीडित महिलांच्या मदत कक्षात जाऊन त्यांनी कामकाजाची माहिती घेत काही सुचनाही केल्या.
जिल्हा रुग्णालयातील आयुष कक्षात जाऊन त्यांनी औषधोपचारांची माहिती घेतली.
जिल्हा रुग्णालयातील उपस्थित स्टाफसोबत जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी संवाद साधला
नवजात शिशू कक्षाची डॉक्टरांकडून माहिती घेताना जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे
जिल्हा रुग्णालयातील उपस्थित स्टाफ नर्सनी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्यासोबत फोटो घेतला.
जिल्हा रुग्णालयातील उपस्थित स्टाफ नर्सनी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्यासोबत फोटो घेतला.
महिला रुग्णांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे
जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांना जिल्हा रुग्णालयाची माहिती देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे
रुग्णांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे
महिला रुग्णांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे