lab-corona4

दिलासा : आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह

बीड

बीड : जिल्ह्यातील आज एकूण 136 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी अगोदर 93 स्वॅब निगेटिव्ह आले होते. उर्वरित स्वॅब देखील आता निगेटिव्ह आलेले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली आहे.
दरम्यान, आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती खालीलप्रमाणे
जिल्हा सामान्य रुग्णालय-49, सी. सी. सी. बीड-23, स्वा. रा. ती. ग्रा. वै .म.अंबाजोगाई-18, सी. सी. सी. आंबाजोगाई-11, उपजिल्हा रुग्णालय केज-1, ग्रामीण रुग्णालय, आष्टी-2, उपजिल्हा रुग्णालय, गेवराई-4, उपजिल्हारुग्णालय, परळी-28 असे एकूण 136 स्वॅब घेण्यात आले आहेत.

Tagged