sonali matre

न्यूज ऑफ द डे

माजलगावची कन्या सोनाली मात्रे sonali matre एमपीएससीमध्ये राज्यात प्रथम

By Karyarambh Team

March 01, 2023

माजलगाव, दि.1 : नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये राज्यात महीलांमधून प्रथम तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक येण्याचा मान माजलगावची कन्या सोनाली अर्जुन मात्रे हिने पटकाविला आहे.आयोगाने 405 पदांसाठी 7, 8 व 9 मे 2022 रोजी मुख्य परीक्षा घेतली होती. सदर परीक्षेचा अंतिम निकाल 28 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. यामधे प्रमोद चौगुले यांनी 633 गुणांसह राज्यात पहिला क्रमांक पटकावला तर शुभम पाटीलला 616 गुण मिळाले आहेत. शुभम पाटील दुसरा आला आहे. महिलामध्ये माजलगाव तालुक्यातील इरला मजरा येथील शेतकरी अर्जुन मात्रे यांची कन्या सोनाली मात्रे पहिली आली आहे. तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत सोनालीला तिसरा क्रमांक मिळाला आहे. सोनाली ही माजलगाव तालुक्यातील ईरला मजरा येथील रहिवाशी असून शेतकरी अर्जुन मात्रे यांची कन्या आहे. सोनालीच्या रूपाने राज्यात एमपीएससी परीक्षेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधिक्षक, तहसीलदार सह एकूण 20 पदांच्या 405 जागांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेब लिंक उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.