pankaja munde

न्यूज ऑफ द डे

आजारी असूनही पंकजाताई मुंडे नियोजित कार्यक्रमासाठी परळीत

By Shubham Khade

March 02, 2023

आल्याबरोबर लगेच जनता दरबार

परळी : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आजारी असूनही आज नियोजित कार्यक्रमांसाठी शहरात दाखल झाल्या. आल्या आल्या लगेच त्यांनी जनता दरबार घेऊन सर्व सामान्य जनतेची गार्‍हाणी ऐकून घेत जागेवरच समस्या मार्गी लावल्या.

पंकजाताई मुंडे यांना दोन-तीन दिवसांपूर्वी फुड पॉयजनिंग झाले होते. इन्फेक्शनमुळे त्यांना अधिकच त्रास होऊ लागला. त्यातच मतदारसंघात नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणे देखील तितकेच महत्वाचे होते त्यामुळे आजारी असूनही दुपारी त्या परळीत दाखल झाल्या. आल्या आल्या त्यांनी लगेच निवासस्थानी जनता दरबार सुरू केला. त्यांना भेटण्यासाठी आणि कामांसाठी मतदारसंघातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकांची गार्‍हाणी ऐकून घेत त्यांनी जनतेच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा केला.