क्राईम

जामीनाच्या मदतीसाठी पोलीस कर्मचार्‍याने मागितले तीन लाख!

By Keshav Kadam

March 09, 2023

एसीबीच्या कारवाईने बीड पोलीसात खळबळ

बीड दि.9 ः दाखल गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी पोलीस कर्मचार्‍याने तीन लाख रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीच्या टिमने गेवराईतील लाचखोर पोलीस कर्मचार्‍यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सादिक सिद्दीकी असे लाच मागणार्‍या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते गेवराई पोलीस ठाण्यात कार्यरत असून 23 नोव्हेंबर 2022 रोजी तक्रारदाराच्या मामावर पोलीसात दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी 3 लाख रुपयाच्या लाचेची पंचासमक्ष मागणी केली. लाच मागणे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाल्याने गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपअधीक्षक दिलीप साबळे, पोलीस हवालदार भीमराज जीवडे, पो.ना पाठक, चालक पोलीस अंमलदार शिंदे, बागुल यांनी केली.