न्यूज ऑफ द डे

ग्रा.पं.मधील पोटनिवडणुकीची घोषणा

By Shubham Khade

April 06, 2023

echo adrotate_group(3);

18 मे रोजी मतदान

बीड : मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्वाच्या महानगरपालिकाच्या निवडणुका विविध कारणांमुळे लांबणीवर पडल्या आहेत. त्यातच आता राज्यातील विविध ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंयतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली असून 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे.echo adrotate_group(7);

राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतमधील रिक्त जागांवर पोटनिवडणुका होणार आहे. ग्रामपंचायतीमधील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुका होणार आहेत. त्यासाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे. यासाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झालेली आहे. निधन, राजीनामा, सदस्यत्व रद्द झालेले अथवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. यासाठी नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत दाखल करता येणार आहेत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 3 मे 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. तर नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 19 मे 2023 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे.echo adrotate_group(8); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);