क्राईम

घरकुलाच्या हप्त्यासाठी लाच स्वीकारणारा एसीबीच्या जाळ्यात!

By Keshav Kadam

April 10, 2023

बीड दि.10 ः मंजूर झालेल्या घरकुलाची तपासणी करुन दुसर्‍या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा केल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केली. गेवराई पंचायत समितीतील कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकास चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीड एसीबीने सोमवार, 7 एप्रिल रोजी रंगेहाथ पकडले.

शिवशंकर विष्णु काळे (रा.धोंडराई ता.गेवराई) असे लाचखोराचे नाव आहे. काळे हा गेवराई पंचायत समितीमध्ये कंत्राटवर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. त्याने तक्रारदाराच्या नावे पंतप्रधान आवास घरकुल योजने अंतर्गत घरकुल मंजूर झालेले होते. सदर घरकुलाची तपासणी करून दुसर्‍या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा केल्याचा मोबदला व भावाच्या मंजुर घरकुलाच्या पहिल्या हप्तयासाठी चार हजार रुपयांची मागणी केली. व चार हजार रुपये लाच स्वतः गेवराई तालुक्यातील राक्षसभवन फाटा येथे स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनखाली बीड उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस अंमलदार सुरेश सांगळे, हनुमंत गोरे, स्नेहल कोरडे यांनी केली.