Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीडमध्ये व्हॉईस ऑफ मीडियाचे मराठवाडा अधिवेशन; ‘हे’ दिग्गज लावणार हजेरी

echo adrotate_group(3);

30 एप्रिलला अधिवेशन, कोळगावच्या ब्लॉगरची प्रकट मुलाखत

बीड : व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने बीड येथे मराठवाडा अधिवेशन रविवार, 30 एप्रिल रोजी माँ वैष्णो पॅलेस, एमआयडीसी, बीड येथे होत आहे. दिवसभर चालणार्‍या या अधिवेशनास उद्घाटक म्हणून खा. प्रीतम मुंडे, खा. इम्तियाज जलील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर, आ. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. या अधिवेशनास मराठवाड्यातील 700 ते 800 पत्रकार उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात आलेले आहे.echo adrotate_group(6);

अधिवेशनाचे उद्घाटन खा. प्रितम मुंडे, खा. जलील, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, व्हॉईस ऑफ मीडीयाचे उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारुण नदवी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. तर, दुपारचे सत्र व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे, राज्याध्यक्ष अनिल म्हस्के, टेलिव्हिजन विंगचे राज्याध्यक्ष विलास बडे, राष्ट्रीय कार्यवाहक शंतनू डोईफोडे, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या पाटील, राष्ट्रीय कोषाध्यक्ष चेतन बंडेवार यांच्या उपस्थितीत होत आहे. तर, समारोप सत्रासाठी आ. धनंजय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, महाआरोग्य दूत तथा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे सहायक सचिव ओमप्रकाश शेटे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच, echo adrotate_group(5);

विशेष उपस्थिती म्हणून कुटे ग्रुपच्या सीईओ अर्चना कुटे, संपादक शिवाजीराव रांजवण, व्यापारी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष संतोष सोहनी, युवा उद्योजक बाजीराव चव्हाण, यश कन्स्ट्रक्शनचे प्रदीप ठोंबरे, युवा उद्योजक शशिकांत कोटुळे, द्वारकादास मंत्री बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, युवा उद्योजक बळीराम गवते, युवा उद्योजक शुभम धूत, युवा उद्योजक रणजित क्षीरसागर, समता परिषदेचे सुभाष राऊत, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश देशपांडे, अंबाजोगाई येथील स्व. अलकाताई मच्छिंद्र शिंदे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पियुष शिंदे यांची उपस्थिती असणार आहे.echo adrotate_group(9);

या अधिवेशनास मराठवाड्यातील पत्रकारांनी उपस्थित रहावे असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, राज्य कार्यवाहक तथा बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर, मराठवाडा कार्याध्यक्ष जालिंदर धांडे, मराठवाडा उपाध्यक्ष शुभम खाडे, मराठवाडा संघटक आनंद डोंगरे, जिल्हा सरचिटणीस प्रभात बुडूख, कार्यवाहक उदय नागरगोजे, केशव कदम, उपाध्यक्ष अमोल जाधव, भागवत जाधव, विनोद जिरे, प्रवक्ते गणेश सावंत, सहसरचिटणीस सुनिल यादव, कोषाध्यक्ष अनंत वैद्य, संघटक अनिल जाधव, अमोल मुळे, एजाज शेख, ज्ञानेश्वर वायबसे, शिरिष शिंदे, मुकेश झणझणे, माजलगाव तालुकाध्यक्ष वैजिनाथ घायतिडक, परळी तालुकाध्यक्ष स्वानंद पाटील, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष प्रदीप तरकसे, केज तालुकाध्यक्ष हनुमंत सौदागर, शिरुर तालुकाध्यक्ष अशोक शिंदे, गेवराई तालुकाध्यक्ष विनोद पौळ, पाटोदा तालुकाध्यक्ष अविराज पवार, धारुर तालुकाध्यक्ष सचिन थोरात, बीड तालुकाध्यक्ष अशोक शिंदे, वडवणी तालुकाध्यक्ष अविनाश मुजमुले, आष्टी तालुकाध्यक्ष अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्यासह व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकारी व संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

कोळगावच्या ब्लॉगरची प्रकट मुलाखत
या अधिवेनाशात सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केल्यास काय बदल घडू शकतो असे दाखवून देत कोळगाव (ता. गेवराई) हे नाव देशभरात गाजवणारे अक्षय रासकर यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. त्यातून पत्रकारांना बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती होणार आहे. echo adrotate_group(10);

Exit mobile version