court

अंबाजोगाई

पोटगीसाठी प्रकरण दाखल केल्यानंतर विवाहिता अल्पवयीन असल्याचे उघड!

By Keshav Kadam

April 26, 2023

अंबाजोगाई दि.26 : घटस्फोट आणि पोटगीबाबत सुरु असलेल्या प्रकरणात महिलेचा विवाह अल्पवयीन असताना झाल्याचे नायायालायाच्या निदर्शनास आले. याची स्वतःहून दखल घेत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.सी. बोरफळकर यांनी सदर महिलेच्या पतीसह इतर नातेवाईकांवर बाल विवाह संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

बालासाहेब रघुनाथ गित्ते याच्या पत्नीने पोटगी मिळण्याकरिता न्यायालयात अर्ज केला होता. हे प्रकरण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.सी. बोरफळकर यांच्या न्यायालयात सुरु होते. दरम्यान, सदर प्रकरणात दोन्ही बाजूत समझोता होऊन त्याप्रमाणे समजपत्र प्रकरणात दाखल करण्यात आले होते. या समजपत्राचे अवलोकन करताना विवाहाच्या वेळी बाळासाहेब गित्ते याची पत्नी अल्पवयीन असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली. विवाहाच्या वेळी मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याचे माहित असताना सुद्धा हा विवाह करण्यात आल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने बालासाहेब गित्ते याच्यासह इतर नातेवाईकांवर बाल विवाह संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयीन सहायक अधीक्षकांना दिले आहेत.