Sharad Pawar

न्यूज ऑफ द डे

शरद पवार Sharad Pawar यांचा मोठा निर्णय; राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडणार, पण….

By Shubham Khade

May 02, 2023

Breaking News

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचेच संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.

मुंबई येथे आज लोक माझा सांगती पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी शरद पवार यांनी ही मोठी घोषणा केली आहे. कुठे थांबायचं हे मला कळतं, म्हणून एनसीपीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. परंतु नेमके कधी निवृत्त होणार हे त्यांनी सांगितले नाही. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. यानंतर आता नवा अध्यक्ष कोण होणार? यावरुन चर्चांना उधाण आलं आहे.