न्यूज ऑफ द डे

फेरफार अदालतीचा शेकडो शेतकर्‍यांना लाभ; 82 मंडळात तब्बल 1,402 फेरफार मंजूर

By Shubham Khade

May 12, 2023

echo adrotate_group(3);

Beed जिल्हाधिकार्‍यांच्या उपक्रमास प्रतिसाद

बीड : जिल्ह्यात महसूल मंडळनिहाय एक महिन्यापेक्षा अधिक काळातील प्रलंबित असलेल्या साध्या व वादग्रस्त फेरफारांची संख्या निश्चित करुन दर महिन्याच्या दुसर्‍या मंगळवारी फेरफार अदालत तहसिल आणि मंडळ स्तरावर आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे दिले होते. मे महिन्यात जिल्ह्यात झालेल्या फेरफार अदालतीमध्ये 82 मंडळात 1 हजार 402 फेरफार मंजूर करण्यात आले असून 60 फेरफार नामंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.echo adrotate_group(6);

   दि.9 मे 2023 रोजी जिल्ह्यातील 11 तालुक्याच्या 82 मंडळामध्ये फेरफार अदालत संपन्न झाली. यामध्ये बीड तालुक्यातील 16 मंडळात 241 फेरफार मंजूर तर 21 नामंजूर करण्यात आले. गेवराई तालुक्यातील 13 मंडळात 334 मंजूर, 6 नामंजूर, शिरूर तालुक्यातील 6 मंडळात 44 मंजूर, अंबाजोगाई तालुक्यात 7 मंडळात 161 मंजूर तर 7 नामंजूर, केज तालुक्यातील 9 मंडळात 194 मंजूर, 7 नामंजूर, माजलगाव तालुक्यात 7 मंडळात 93 मंजूर,11 नामंजूर, धारूर तालुक्यात 4 मंडळात 82 मंजूर, पाटोदा तालुक्यातील 4 मंडळात 60 मंजूर, 5 नामंजूर, आष्टी तालुक्यात 10 मंडळात 68 मंजूर, 3 नामंजूर, परळी तालुक्यातील 6 मंडळात 125 फेरफार मंजूर करण्यात आले. न्यायालयीन कामामुळे वडवणी तालुक्यात 10 मे रोजी फेरफार अदालत संपन्न झाली. फेरफार अदालत महिन्याच्या दुसर्‍या मंगळवारी शासकीय सुट्टी असल्यास त्याच्या लगतच्या दुसर्‍या दिवशी आयोजित करावी. उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी याकामी पर्यवेक्षण ठेऊन नोंदणीकृत व अनोंदणीकृत साध्या नोंदी एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आणि विवादग्रस्त नोंदी 3 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी सबळ कारणाशिवाय प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.echo adrotate_group(8);echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);