क्राईम

गेवराई तालुक्यात गांजाची शेती!

By Keshav Kadam

May 12, 2023

बीड दि.12 : गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परिसरामध्ये गांजाची शेती असल्याची माहिती बीट अंमलदार मुकेश गुंजाळ यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठांना माहिती देवून शुक्रवारी (दि.12) दुपारच्या सुमारास शेतात छापा मारला, यावेळी 25 ते 30 छोटी-मोठी गाजांची झाडे जप्त करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परिसरात कल्याण-विशाखापट्टनम महामार्गावरुन चार ते पाच किमी अंतरावर एका शेतात गांजाची शेती करण्यात आली होती. याची माहिती तलवाडा पोलीसांना मिळाली. त्यांनी शेतात छापा मारला असता 25 ते 30 गांजाची झाडे आढळून आली. त्याची अंदाजे किंमत दोन लाखाच्या जवळ आहे. ही शेती कुणाची आहे? याचा तपास पोलीस करत असून तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, गेवराई उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे, जमादार मुकेश गंजाळ, सचिन अलगट यांच्यासह आदींनी केली.