devsthan jamin

आष्टी

आष्टीचे गायरान अतिक्रमण प्रकरण तापणार

By Shubham Khade

May 17, 2023

echo adrotate_group(3);

साडेतीन हजार अतिक्रमणधारकांना नोटीस

बीड : गेल्या काही दिवसांपासून शासकीय गायरान अतिक्रमण प्रकरण चर्चेत आले आहे. दरम्यान आता हा मुद्दा आणखीच तापण्याची शक्यता असून, राज्यातील अनेक भागातील गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना नोटीस पाठवण्यात येत आहे. दरम्यान अशाच काही नोटीस बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील साडेतीन हजार नागरिकांना पाठवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तर ताबा सिद्ध करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.echo adrotate_group(7);

आष्टी तालुक्यातील सरकारी मालकीच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना नागरिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच या जमिनीवरील ताबा सिद्ध करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मात्र, अतिक्रमणधारक यात अपयशी ठरल्यास त्यांनी अतिक्रमण पुढील 60 दिवसांत स्वत: काढावे, अन्यथा हे निष्कासित करण्यात येणार आहे. आष्टी तालुक्यातील जवळपास साडेतीन हजार अतिक्रमणधारकांना महसूल विभागाने नोटीस धाडल्या आहेत.echo adrotate_group(8);

गायरान क्षेत्रावरील अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी प्रशासन कामालाआष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गायरान जमीन क्षेत्र असल्याने अनेकांनी त्यावर अतिक्रमण करुन पाच एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर मालकी हक्क दाखवला आहे. तसेच काही लोकांनी लोकांनी शासकीय गायरान जमिनीवर कोणतेही परवानगी न घेता बांधकाम देखील केले आहेत. त्यामुळे राज्यातील गायरान जमिनीवरील केलेली अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत वर्षअखेर निष्कसित करण्याचे आदेश असल्याने स्थानिक प्रशासन कामाला लागले आहे.echo adrotate_group(9);

…अन्यथा नोटीस न देता अतिक्रमण काढून घेण्यात येईलतर केलेले अतिक्रमण 60 दिवसांच्या आत काढून घेण्याची नोटीस देण्यात आली आहे. शासकीय जागेवरील केलेले अतिक्रमण दूर करुन त्यांचा ताबा मंडळ अधिकाऱ्याकडे न दिल्यास कोणत्याही प्रकारची नोटीस न देता आपले अतिक्रमण अथवा बांधकाम शासकीय खर्चाने निष्कासित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील तरतुदीनुसार महसूलची थकबाकी म्हणून अतिक्रमणधारकांकडून वसूल करण्यात येईल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

अधिकारी म्हणतात….आष्टी तालुक्यातील शासकीय गायरान जमिनीवर शेती कसत असलेले आणि घर बांधकाम केलेल्या साडेतीन हजार अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. अतिक्रमण केलेल्यांना शेती संबंधित पुरावे आणि नियमानुसार असलेले पुरावे सादर करण्याचे कळवले असल्याची माहिती तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी माध्यमांना दिली आहे. echo adrotate_group(1);