accident

क्राईम

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

By Keshav Kadam

May 20, 2023

माजलगाव-गढी रोडवरील घटनामाजलगाव दि.20 : अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना माजलगाव -गढी रोडवरील केसापूरी कॅम्प परिसरात शनिवारी (दि.20) दुपारच्या सुमारास घडली.

विकास रामदास खरात (वय 32 रा.केसापूरी ता.माजलगाव) हा तरुण माजलगाव ते गढी रोडने दुचाकीवर माजलगावकडे येत होता. या दरम्यान शनिवारी दुपारी केसापुरी कॅम्प परिसरात दुचाकीला (एमएच-23, जीजे-2283) माजलगावकडून जाणार्‍या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात विकास खरातचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दाभाडे, पोह.श्रीमंत पवार, तोटेवाड यांनी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.