क्राईम

पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

By Keshav Kadam

May 23, 2023

बीड दि.23 : पाटोदा येथील पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.23) दुपारच्या सुमारास घडली.

युवराज दामोदर राऊत (वय 35 रा.नाळवंडी ता.बीड) असे पोलीस हवलदार यांचे नाव आहे. आज सकाळी ड्यूटीवर असताना त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी बीडकडे हलविण्यात आले. परंतु दुर्दैवाने वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. राऊत यांच्या पश्चात एक दोन ते तीन महिन्याचा मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.