ACB TRAP

महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह खाजगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात

न्यूज ऑफ द डे परळी बीड

Private persons including Junior Engineers of Mahavitran (Kiran Jaywant Nimbalkar) in ACB network

बीडच्या एसीबीची कारवाई

बीड : विहीरीच्या फाईलमधील नाहरकत प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी परळी येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह खाजगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. बीडच्या एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

किरण जयवंत निंबाळकर (वय 29 वर्ष, पद- कनिष्ठ अभियंता, महावितरण कार्यालय, उपविभाग परळी, रा.बँक कॉलनी,परळी ता.परळी जि. बीड), शाहनिक दत्तात्रय अनुसे, (वय 35 वर्ष, व्यवसाय- खाजगी काम, रा.रेवली ता.परळी जि.बीड) असे लाचखोरांची नावे आहेत.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांचे व साक्षीदारांच्या भावाचे नावे असलेल्या शेतामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत अल्प भुधारक शेतकरी सिंचन विहीरीच्या फाईलमधील नाहरकत प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी आरोपी लोकसेवकाने पंचासमक्ष खाजगी इसमाचे मार्फतीने लाचेची मागणी करून लाच रक्कम खाजगी इसमामार्फत स्वीकारण्याचे मान्य केले. खाजगी व्यक्तीने 3000 रूपयांची मागणी करून तडजोडीअंती फाईलवर सही घेऊन देण्यासाठी स्वतःसाठी 200 रुपये व लोकसेवकासाठी 500 रुपये असे तीन फाईलचे प्रत्येकी 700 रुपयांप्रमाणे 2100 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पडताळणीअंती हा प्रकार लक्षात आला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी यांच्यासह श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, गणेश म्हेत्रे आदींनी केली.

Kiran Jaywant Nimbalkar (Age 29 years, Post- Junior Engineer, General Distribution Office, Sub-Division Parli, R. Bank Colony, Parli Dist. Parli Dist. Beed), Shahnik Dattatray Anuse, (Age 35 years, Occupation- Private Work, R. Revali Parli Dist. Beed) are the names of the bribe takers.

Tagged