क्राईम

करंट बसल्याने चुलत्या-पुतण्याचा जागीच मृत्यू

By Keshav Kadam

May 27, 2023

Gevarai दि.27 : इमारतीचे बांधकाम करणार्‍या चुलत्या-पुतण्याला विद्यूत तारेचा शॉक बसल्याने, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.27) दुपारच्या सुमारास गेवराई तालुक्यातील येथे घडली आहे. (Due to electric shock, both died on the spot.)

शेख फेरोज इस्माईल (वय 45), शेख समीर जुबेद (वय 27) अशी मयतांची नावे आहेत. गेवराई शहरातील संजयनगर येथील रहिवाशी आहेत. ते चुलते पुतणे असून मिस्त्री काम करतात. ते मन्यारवाडी येथील एका बिल्डिंगचे प्लास्टर (बांधकाम) करण्यासाठी गेले होते. बांधकाम करत असतानाच समीर शेख यांना विद्यूत तारेचा शॉक बसला. आपल्या पुतण्याला शॉक बसल्याचे दिसताच शेख फेरोज हे त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र या घटनेत दोघांचा ही जागीच मृत्यू झाला. पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला असून, दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.