prapoz in gautmi patil

गौतमी पाटीलला बीडच्या रोहन पाटीलने घातली लग्नाची मागणी

न्यूज ऑफ द डे मनोरंजन महाराष्ट्र

बीड, दि.30 : महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली गौतमी gautami patil पाटील हीला बीड जिल्ह्यातील केजच्या चिंचोलीमाळी येथील एका तरूणाने थेट लग्नाची मागणी घातली आहे. या तरूणाने म्हटले आहे, मी तुला जशी आहे तशी स्विकारायला तयार आहे. बोल होशील का माझी परी? तर मग ये माझ्या थेट घरी असे म्हणत गौतमीला साद घातली आहे.

रोहन गलांडे पाटील rohan patil (वय 26) याने गौतमी पाटीलला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय, की गौतमी पाटील तू होती का माझी परी, मी रोहन गलांडे पाटील मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तुझ्या सर्व इच्छा अटी मला मान्य आहेत. मी रोहन गलांडे पाटील, मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तू जशी आहेस, तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्या सोबत कुणी लग्नाला तयार नसले तरी मी माणुसकीच्या नात्याने तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. माझे वय 26 वर्ष आहे आणि मी एक शेतकरी पुत्र आहे. त्यामुळे शेती बागायती आहे, दुग्ध व्यवसाय आहे. तू जर माझ्या सोबत लग्नाला तयार असशील तर मला भेटायला ये. मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. असे रोहन गलांडे पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे. इतकेच नाही तर या तरुणाने आपल्या पत्रात घराचा पत्ता देखील लिहिला आहे. दरम्यान वराच्या शोधत असणारी गौतमी पाटील, बीडच्या या रोहन गलांडे पाटलाच्या पत्राला काय उत्तर देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

goutami patil
goutami patil viral video

काय म्हणाली होती गौतमी?
गौतमी म्हणाली होती की, आता मी 25 वर्षांची आहे. लग्न करून घरसंसर थाटावा अशी माझी ईच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा, अशी माझी मनापासून ईच्छा आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे.

Tagged