क्राईम

त्या अपघातातील जखमीचाही मृत्यू

By Karyarambh Team

June 15, 2020

नेकनूर : बियाणे घेवून दुचाकीवरुन गावी परतत असतांना कारच्या धडकेत दोन शेतकर्‍यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये एका जखमीला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.15) दुपारच्या सुमारास लिंबागणेश परिसरातील मुळूक चौकामध्ये झाला.

बंकट बाबू मोरे (वय 50), संजय बाळू सोनवणे (वय 45) अशी मयतांची नावे आहेत तर जखमी गोरख बबन मोरे (वय 32 सर्व.रा.मसेवाडी ता.बीड) यांच्यावर लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. बंकट, संजय व गोरख हे तिघेजण दुचाकीवरुन (एमएच-23 एस-8146) बीयाणे घेवून मसेवाडी गावाकडे परतत होते. यावेळी लिंबागणेश परिसरतील मुळूक चौकामध्ये समोरुन भरधाव आलेल्या कारने (एमएच-12 जेझेड-6727) दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये बंकट व संजय यांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान गोरख यांचाही मृत्यू झाला.