हप्त्याने ऑनलाईन मागविला मोबाईल, मिळाल्या दोन कपडे धुण्याच्या साबणी!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड येथील प्रकार; सायबर पोलीसात तक्रार (Amazon Complain to Cyber Police)
बीड
दि.12 : (beed) सध्या ऑनलाईन खरेदीवर सर्वांचाच मोठा भर आहे. परंतू फसवणूकही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना सावध भूमिका घेण्याची गरज आहे. बीडमध्ये एका तरुणाने अमेझॉनवरुन ऑनलाईन मोबाईल खरेदी केला, परंतू बॉक्समध्ये मोबाईल ऐवजी दोन कपडे धुण्याच्या साबणी आढळून आल्या. या प्रकरणी तरुणाने सायबर पोलीसात (Cyber Police) धाव घेत तक्रार दाखल केली आहे. (Amazon Complain to Cyber Police)

रमेश प्रभाकर गायकवाड (रा.भक्ती कन्स्ट्रक्शन, बीड) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी 29 मे रोजी अ‍ॅमेझॉन (Amazon.in) वेबसाईडवरुन ऑनलाईन वन प्लस कंपनीचा मोबाईल (one plus mobile) रक्कम रुपये 28 हजार 998 हा एसबीआय के्रडिट कार्ड एमआयवरुन 2 हजार 617 रुपये हप्त्याप्रमाणे खरेदी केला. 2 जून रोजी अ‍ॅमेझॉन यांचे पार्सल आले. ते उघडल्यानंतर त्यामध्ये मोबाईल आढळून आला नाही. त्याऐवजी दोन इएक्सओ कंपनीच्या कपडे धुण्याच्या दोन साबणी आढळून आल्या. याचा पूर्ण व्हिडीओ करण्यात आला आहे. फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी तक्रार सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police) देण्यात आली आहे.

Tagged