atyachar

शेतात शेळ्या चारणार्‍या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार!

क्राईम न्यूज ऑफ द डे माजलगाव


तिघांवर पोस्कोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल; आरोपी अटकेत
माजलगाव
दि.13 ः तालुक्यातील एका गावात शेतामध्ये शेळ्या चारणार्‍या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला. ही घटना शनिवार व रविवार रोजी तालुक्यातील एका गावात घडली. दरम्यान पीडितेच्या फिर्यादीवरून तिघांवर माजलगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Abuse of two minor girls!)

शनिवारी पीडित दोन अल्पवयीन मुली तालुक्यातील एका गावाच्या शेजारी असणार्‍या शेतात शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी तिघेजण दुचाकीवर तिथे आले. यातील दोघांनी दोघींना जबरदस्ती उसामध्ये घेऊन जात अत्याचार केला. त्याचप्रमाणे रविवार रोजी अकरा वाजता यातील एका पीडितेला आरोपीने तिसर्‍या तरुणाला सोबत आणत त्यासोबत बळजबरीने संबध ठेवण्यास धमकी दिली. त्यानेही अत्याचार केले. पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून विकास बरडे, करण माळी व केशव राऊत तिघांवर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तीनही आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड हे करत आहे.

Tagged