आघोरी! घरातील वाईट शक्ती बाहेर काढण्यासाठी 14 तोळे सोने लंपास!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीडमध्ये सुवर्ण कलश पुजेच्या नावाखाली शिक्षिकेला गंडविले
बीड
दि.13 : beed घरातील वाईट शक्ती बाहेर काढण्यासाठी कलश पुजा करायला लावत दोन भामट्यांनी कलशातील तब्बल 14 तोळे सोने लांबवल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिक्षिकेच्या (teacher) फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन भामट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (14 tolas of gold stolen by fraud)

घरामध्ये वाईट शक्ती आहे, त्यामुळेच दुखणे मागे लागले आहे. त्यामुळे ती वाईट शक्ती बाहेर काढण्यासाठी घरात कलश पुजा करावी लागेल असे सांगुन घरात प्रवेश केला. फक्त कलश पुजाच नव्हे तर सुवर्ण कलश पुजा करावी लागेल असे सांगुन घरातील सर्व सोन्याचे (gold)दागिने एका कलशमध्ये ठेवण्यास सांगितले. त्यानंतर घरातील सर्वांना बाहेर पाठवून दिले आणि सोने असलेल्या कलशच्या ऐवजी दुसराच एक कलश त्याठिकाणी ठेवला. त्यानंतर हा कलश त्या कुटूंबियांच्या हाती देत 12 ते 13 वर्ष हा कलश उघडू नका अन्यथा अनर्थ होईल असेही सांगितले. सदरील प्रकार 14 मे 2023 रोजी सायंकाळच्या सुमारास शिवाजीनगर हद्दीत घडला. मात्र या कुटूंबियांना संशय आल्याने त्यांनी कलश उघडून पाहिले असता त्यामध्ये सोन्याचे दागिन्याऐवजी कोळसा आढळून आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर 12 जुन 2023 रोजी संजीवनी हनुमंतराव मेडकर यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र लोटके, मिना लोटके (रा.खंडाळा जि.अहमदनगर) या दोघांविरूध्द कलम 420, 406, 418 भांदवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत. (shivajinagar police station)

Tagged