आयजी म्हणाले, सर्व डीवायएसपीनी बीड जिल्ह्यात कुठेही कारवाई करावी

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि.22: जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाली तर कुठलाही पोलीस उपअधीक्षक कारवाई करेल, फक्त कारवाई पारदर्शक असावी अशा सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिल्या आहेत.

विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी शुक्रवारी (दि.22) बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत सुसंवाद साधला. यावेळी बोलताना चव्हाण म्हणले की, जिल्ह्यात कुठे अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाली तर ज्यांना कुणाला माहिती मिळेल त्या पोलीस उपअधीक्षक यांनी कारवाई करावी. फक्त ही करावी पारदर्शक असावी. अशा सूचना चव्हाण यांनी दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक कविता नेरकर, सहायक अधीक्षक पंकज कुमावत, उपअधीक्षक श्वेता खाडे, अभिजीत धराशिवकर, चोरमले आदींची उपस्थिती होती.

Tagged