पाच सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


आर्थिक गुन्हे शाखेचे सुजित बडे एसीबीत
बीड
दि.23 : जिल्ह्यात कालावधी पूर्ण झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या (API) शुक्रवारी (दि.23) बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये जिल्ह्यातील पाच सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

यामध्ये बीड शिवाजीनगर ठाण्यातील मनोजकुमार श्रीरंग लोंढे-कोल्हापूर, महेश पाटीलबा आंधळे-नाहर्स, आर्थिक गुन्हे शाखेतील सुजित शिवाजी बडे-लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अंभोरा पोलीस ठाण्याचे रोहित गंगाधरराव बेंबरे-अमरावती परिक्षेत्र, जिल्हा वाहतूक शाखेतील संदिप अंबादास काळे-अमरावती परिक्षेत्र यांची बदली झाली असून जिल्ह्यात नव्याने काही अधिकारी येणार आहेत.

Tagged