देश विदेश

‘या’ राज्यात पुन्हा लॉकडाऊन

By Karyarambh Team

June 15, 2020

echo adrotate_group(3);

नवी दिल्ली : दक्षिण भारातातील तामिळनाडूमध्ये पुन्हा कडकडीत लॉकडाऊन करण्यात आला आहे. तमिळनाडूच्या 4 जिल्ह्यांमध्ये कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. 19 जून ते 30 जून या दरम्यान हा लॉकडाऊन असले. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तामिळनाडू सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.echo adrotate_group(7);

चेन्नई, तिरुवेलूर, कांचीपुरम, जिंगलपेठ या भागात कडक लॉकडाऊन असेल. यामध्ये रिक्षा, बस सेवा पूर्णपणे बंद असणार आहे. सरकारी कार्यालयात फक्त 33 टक्के हजेरी असेल, तर अत्यावश्यक सेवांची दुकान सकाळी सहा ते दुपारी दोन पर्यंत सुरू राहणार आहेत. दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 80 लाखाच्या जवळपास पोहोचली आहे. डब्ल्यूएचओच्या मते, गेल्या 24 तासांत 1 लाख 22 हजार 298 नवीन प्रकरण पुढे आल्यानंतर, जगातील कोरोना रुग्णाची संख्या वाढून 79,82,822 झाली आहे. त्याच वेळी, या साथीच्या आजारामुळे 4,35,166 लोकांचा जीव गेला आहे.echo adrotate_group(8); echo adrotate_group(1);echo adrotate_group(9);