न्यूज ऑफ द डे

बीड जिल्हा पोलीस दलातील सहायक निरीक्षकांच्या बदल्या!

By Keshav Kadam

June 29, 2023

बीड दि.29 ः जिल्हा पोलीस दलातील (BEED POLICE) सहा सहायक पोलीस निरीक्षकांच्या (API TRANSFER) विनंती बदली झाली असून जिल्ह्यात नव्याने चार सहायक पोलीस अधिकारी येणार आहेत. तर सहा जणांची विनंती बदली अमान्य करण्यात आली आहे. या बदल्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी गुरुवारी (दि.29) काढले आहेत.

बीड जिल्हा पोलीस दलातील सहायक निरीक्षक मारोती मुंडे-उस्मानाबाद, शरद भुतेकर-जालना, श्यामकुमार डोंगरे-उस्मानाबाद, रविंद्र शिंदे-उस्मानाबाद, प्रदिप एकशिंगे-जालना, प्रताप नवघरे-औरंगाबाद ग्रामीण येथे बदली झाली आहे. तर परिक्षेत्रातून बीड जिल्ह्यात आलेल्यामध्ये औरंगाबाद ग्रामीण येथून प्रल्हाद लक्ष्मण जाधव, उस्मानबाद येथून गणेश अर्जून मुंडे, सतिश पांडुरंग कोटकर, जालना येथून सुभाष बाळासाहेब सानप हे जिल्ह्यात येणार आहेत. तर बीड जिल्हा पोलीस दलातील विजय देशमुख, केदारनाथ पालवे, योगेश खटकळ, संतोष मिसळे, निता गायकवाड, रामचंद्र पवार यांची विनंती बदली अमान्य करण्यात आली आहे.