न्यूज ऑफ द डे

बीड स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार यांच्याकडे

By Keshav Kadam

July 01, 2023

बीड दि. 26 : येथील स्थानिक गुन्हेचे निरीक्षक सतीश वाघ यांची आठवडाभरापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली. त्यानंतर बीड स्थानिक गुन्हे शाखेचा तात्पुरता पदभार माजलगाव ग्रामीण ठाण्यात नियुक्ती दिलेल्या पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा ही पोलीस दलातील सर्वात महत्वाची शाखा आहे. त्यामुळे या पदावर बसणारा अधिकारी हा सतर्क व पदाला न्याय देणारा असला पाहिजे. स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती मिळावी यासाठी अनेकांनी लॉबिंग केल्याची चर्चा होते, त्यामुळे नियुक्ती कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. शिवाजी बंटेवाडयांच्या रुपाने तात्पुरत्या स्वरूपात का होईना स्थानिक गुन्हे शाखेला खमक्या अधिकारी मिळाला आहे. चोरी, दरोडा, घरफोडी यासह गुटखा, मटका अशा अवैध धंद्यांना आवर घालण्याचे बंटेवाड यांच्यासमोर आव्हान असणार आहे.