mahalxmi kalakendra kaij

कला केंद्राआडून वेश्या व्यवसाय, उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदेवर गुन्हा नोंद

क्राईम महाराष्ट्र राजकारण

केज ठाणे हद्दीत आयपीएस पंकज कुमावत यांची कारवाई


बीड, दि.7 : केज तालुक्यात रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या एका कलाकेंद्रावर सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा मारला. येथून अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांनी कलाकेंद्र चालकांसह काही ग्राहकांना देखील अटक केली आहे. रात्री उशीरा मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांना या कलाकेंद्रात वापरलेले व न वापरलेले कंडोम देखील सापडले आहेत. त्यामुळे कला केंद्राच्या नावाखाली उबाठा गटाच्या जिल्हाप्रमुखाची वेगळीच कला चालत असल्याचे स्पष्ट झाले. पोलीसांनी एकूण 36 जणांवर गुन्हे नोंद केले आहेत. त्यात शिवसेनेच्या उबाठा UBT Shivsena beed गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे ratnakar shinde यांचा देखील समावेश आहे.


केज तालुक्यातील उमरी येथील महालक्ष्मी कला केंद्र चालवले जाते. या कला केंद्रात वेश्या व्यवसाय चालत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी शुक्रवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास छापा टाकला असता या ठिकाणी अनेक रुममध्ये पार्टी नृत्य सुरू होते. त्यावेळी या ठिकाणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे हे त्या ठिकाणाहून पळून गेले. या ठिकाणी त्यांचा एक आयफोन पोलीसांना सापडला. तर ते वापरत असलेली स्कॉर्पिओ गाडी क्र. एमएच 23 झेड 0707 तसेच इनोव्हा गाडी क्र.44 वाय 7001 पत्र्याच्या शेडमध्ये पोलीसांना मिळून आली. रत्नाकर शिंदे हे संबंधीत थेअटर पार्टनरशिपमध्ये चालवत असल्याची बाब पोलीसांनी एफआयआरमध्ये नमूद केली आहे.


शिवाय नृत्य कला केंद्रात नृत्य करणार्‍या एका मुलीकडे पोलीसांनी विचारपूस केली असता तिने आपले लैंगिक शोषन झाले असल्याचे पोलीसांना सांगितले. त्यामुळे अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या पोलीस निरीक्षक एस.एस.धस यांनी या पीडितेचा जवाब नोंदवून घेतला आहे. सदर पीडिता ही अल्पवयीन आणि दलीत समाजाची आहे. हे माहिती असतानाही तिच्यावर दबाव टाकून हा प्रकार करवून घेतल्याचे पोलीसांच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. त्यामुळे सर्व आरोपींवर कलम 188, 109, 114, 290, 34, 370(4), (5),370 (अ), 373, 376 (फ) (आय), भादंविसह कलम 4, 6, 17, 18, 21, बालकांचे लैंगिक अत्याचार अधिनियम, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 3,4,5,6,8,9 बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 75, 79 तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा (5) मुं.दा.का. कलम 65 (ई) प्रमाणे कायदेशीर फिर्याद देण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी आयपीएस पंकज कुमावत हे करीत आहेत.

36 आरोपींविरोधात गुन्हा नोंद

लहू रामहारी अंधारे, शितल लोदगेकर, सत्वशीला बाबासाहेब अंधारे, रत्नाकर शिंदे, मंदा चंदन, सुरेखा भारत काळे, रेखा अंधारे, ज्योती अडागळे, सीमा पाटील, रुपाली भुतकर, स्नेहा जाधव, कांचन गुनवणे, मीना अंधारे, निकिता जाधव, दिपाली शिंदे, कोमल मुसळे, सपना कचरे, रेणू कचरे, अश्विनी सोनकांबळे वरील सर्व महालक्ष्मी कला केंद्र केज येथील आहेत. त्यांच्यासह ग्राहक चंद्रकांत महादेव चोले (रा. हिवरा पहाडी)chandrakant mahadeo chole, विठ्ठल मसुदेव चोले (रा. खडकी देवळा ता. वडवणी), viththal chole महादेव काशीनाथ दराडे (रा. खडकी देवळा ता. वडवणी) mahadeo kashinath darade, अक्षय भाऊसाहेब उगलमुगले (नारेवाडी ता. केज) akshay bhausaheb ugalmugale, ज्ञानदेव कारभारी खंदारे (कारेगव्हाण ता. केज) dnyandeo karbhari khandare, आत्माराम कोंडीराम मुंडे (ताडसोन्ना ता.बीड) atmaram kondiba munde, महादेव संदीपान वाघमारे (रा. हिवरा पहाडी ता. वडवणी)mahadeo sandipan waghmare, नितीन नानाभाऊ वाघमारे (हिवरापहाडी ता. वडवणी) nitin nanabhau waghmare, अशोक नारायण वाघमारे ashok narayan waghmare (हिवरापहाडी ता. वडवणी), शुभम बलभीम कांबळे (जवळा खुर्द ता. केज) shubham balbhim kambale, गणेश राजाभाऊ कांबळे (जवळा खुर्द ता. कळंब) ganesh rajabhau kambale, समाधान अण्णा कांबळे (जवळा खुर्द ता. कळंब) samadhan anna kambale, गजेंद्र ज्ञानदेव कांबळे रा.जवळा खुर्द कळंब) gajendra dnyandeo kambale, मनोज बालासाहेब शिंदे (क्रांती नगर केज) manoj balasaheb shinde, किरण अनिल बडे (क्रांती नगर केज) kiran anil bade, नेहाल अशोक कांबळे (क्रांती नगर केज) nehal ashok kambale, अखील अजिमोद्दीन सय्यद (क्रांती नगर केज) akhil ajimoddin sayyad

Tagged