वेश्या व्यवसाय चालवत असणारे शिवसेना जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे पदावरून कार्यमुक्त

केज न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र राजकारण

बीड, दि. 8 : केज तालुक्यातील उमरी शिवारात कला केंद्राच्या नावाखाली अल्प वयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी काल केज पोलिसात गुन्हा नोंद झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांना जिल्हा प्रमुख पदावरून तत्काळ पदमुक्त करण्यात आल्याचे प्रसिध्दी पत्रक शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांनी प्रसिद्धीस दिले आहे. सुषमा अंधारे यांनी रत्नाकर शिंदे जिल्हा प्रमुख व्हावेत म्हणून आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळेच तत्कालीन जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी त्यांना दोन चापट्या लगावल्याचे म्हटले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण
केज तालुक्यात रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या एका कलाकेंद्रावर सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा मारला. येथून अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांनी कलाकेंद्र चालकांसह काही ग्राहकांना देखील अटक केली आहे. रात्री उशीरा मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांना या कलाकेंद्रात वापरलेले व न वापरलेले कंडोम देखील सापडले आहेत. त्यामुळे कला केंद्राच्या नावाखाली उबाठा गटाच्या जिल्हाप्रमुखाची वेगळीच कला चालत असल्याचे स्पष्ट झाले. पोलीसांनी एकूण 36 जणांवर गुन्हे नोंद केले आहेत. त्यात शिवसेनेच्या उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांचा देखील समावेश आहे.
केज तालुक्यातील उमरी येथील महालक्ष्मी कला केंद्र चालवले जाते. या कला केंद्रात वेश्या व्यवसाय चालत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी शुक्रवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास छापा टाकला असता या ठिकाणी अनेक रुममध्ये पार्टी नृत्य सुरू होते. त्यावेळी या ठिकाणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे हे त्या ठिकाणाहून पळून गेले. या ठिकाणी त्यांचा एक आयफोन पोलीसांना सापडला. तर ते वापरत असलेली स्कॉर्पिओ गाडी क्र. एमएच 23 झेड 0707 तसेच इनोव्हा गाडी क्र.44 वाय 7001 पत्र्याच्या शेडमध्ये पोलीसांना मिळून आली. रत्नाकर शिंदे हे संबंधीत थेअटर पार्टनरशिपमध्ये चालवत असल्याची बाब पोलीसांनी एफआयआरमध्ये नमूद केली आहे.
शिवाय नृत्य कला केंद्रात नृत्य करणार्‍या एका मुलीकडे पोलीसांनी विचारपूस केली असता तिने आपले लैंगिक शोषन झाले असल्याचे पोलीसांना सांगितले. त्यामुळे अनैतिक मानवी पाहतूक कक्षाच्या पोलीस निरीक्षक एस.एस.धस यांनी या पीडितेचा जवाब नोंदवून घेतला आहे. सदर पीडिता ही अल्पवयीन आणि दलीत समाजाची आहे. हे माहिती असतानाही तिच्यावर दबाव टाकून हा प्रकार करवून घेतल्याचे पोलीसांच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. त्यामुळे सर्व आरोपींवर कलम 188, 109, 114, 290, 34, 370(4), (5),370 (अ), 373, 376 (फ) (आय), भादंविसह कलम 4, 6, 17, 18, 21, बालकांचे लैंगिक अत्याचार अधिनियम, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 3,4,5,6,8,9 बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 75, 79 तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा (5) मुं.दा.का. कलम 65 (ई) प्रमाणे कायदेशीर फिर्याद देण्यात आली.

36 आरोपींविरोधात गुन्हा नोंद
लहू रामहारी अंधारे, शितल लोदगेकर, सत्वशीला बाबासाहेब अंधारे, रत्नाकर शिंदे, मंदा चंदन, सुरेखा भारत काळे, रेखा अंधारे, ज्योती अडागळे, सीमा पाटील, रुपाली भुतकर, स्नेहा जाधव, कांचन गुनवणे, मीना अंधारे, निकिता जाधव, दिपाली शिंदे, कोमल मुसळे, सपना कचरे, रेणू कचरे, अश्विनी सोनकांबळे वरील सर्व महालक्ष्मी कला केंद्र केज येथील आहेत. त्यांच्यासह ग्राहक चंद्रकांत महादेव चोले रा. हिवरा पहाडी, विठ्ठल मसुदेव चोले रा. खडकी देवळा, महादेव काशीनाथ दराडे रा. खडकी देवळा, अक्षय भाऊसाहेब उगलमुगले नारेवाडी, ज्ञानदेव कारभारी खंदारे कारेगव्हाण, आत्माराम कोंडीराम मुंडे ताडसोन्ना, महादेव संदीपान वाघमारे रा. हिवरा पहाडी, नितीन नानाभाऊ वाघमारे हिवरापहाडी, अशोक नारायण वाघमारे हिवरापहाडी, शुभम बलभीम कांबळे जवळा खुर्द, गणेश राजाभाऊ कांबळे जवळा खुर्द , समाधान अण्णा कांबळे जवळा खुर्द ता. कळंब, गजेंद्र ज्ञानदेव कांबळे जवळा खुर्द कळंब, मनोज बालासाहेब शिंदे क्रांती नगर केज, किरण अनिल बडे क्रांती नगर केज, नेहाल अशोक कांबळे क्रांती नगर केज, अखील अजिमोद्दीन सय्यद क्रांती नगर केज,

Tagged