क्राईम

स्वतःच्या श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून तरुणाने केली आत्महत्या!

By Keshav Kadam

July 09, 2023

नेकनूर दि.09: बीड तालुक्यातील अंधापुरी घाट येथील तरुणाने मोबाईलवर स्वतःच्या श्रद्धांजलीचा स्टेटस ठेऊन शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. शुभम बाळासाहेब जगताप (वय २०), असे तरुणाचे नाव आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शेतीचे वाद चुलत्या सोबत चालु होते आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून शुभम ने स्वतःच्या मोबाईल वर स्वतः चा फोटो टाकून त्यावर भावपुर्ण श्रध्दांजली लिहून आत्महत्या केली. शुभमचे मामा शिवाजी घरत यांनी याबाबत माहिती दिली. या धक्कादायक घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलीस दाखल झाले असून पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह नेकनुर कुटीर रुग्णालयात पाठवला.