केज

20 जेसीबीतून पुष्पवृष्टी, 2 क्विंटलचा पुष्पहार

By Shubham Khade

July 13, 2023

केजमध्ये धनंजय मुंडेंचे अभुतपूर्व स्वागत; विष्णू चाटे यांचे नियोजन

केज : मंत्री झाल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यात आलेल्या धनंजय मुंडे यांचे केज शहरातील धारूर चौकात गुरुवारी सायंकाळी अभुतपूर्व स्वागत करण्यात आले. याचे संपूर्ण नियोजन युवा नेते विष्णू चाटे यांच्यासह संपूर्ण टीमने केले होते. या स्वागत समारंभाने जिल्ह्याचे लक्ष वेधले. या सत्कारप्रसंगी धनंजय मुंडेंसमवेत राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांची उपस्थिती होती.

धनंजय मुंडे हे केज शहरात आल्यानंतर त्यांचे प्रथम राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानासमोर स्वागत करण्यात आले. त्यानंतर धारूर चौकात भजनी मंडळाकडून टाळ मृदंगाच्या गजरात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी 20 जेसीबीतून पुष्पवृष्टी करत दोन क्विंटलचा पुष्पहार घालण्यात आला. यावेळी बजरंग सोनवणे यांच्यासह युवा नेते विष्णू चाटे, सारंग आंधळे, बालाजी तांदळे, चंदू चौरे, नगरसेवक अजझर इनामदार, दादासाहेब चाटे, संजय केदार, उत्रेश्वर शेप, किरण राऊत, खंडू चौरे, बाळू गोरे, ज्योतीराम मुळे, रोहित हंगे, प्रमोद चाटे, धनंजय मोराळे यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान, यावेळी स्वागत समारंभ पाहून नागरिक भारावून गेले होते. केज शहरात अशा पद्धतीचे अभुतपूर्व स्वागत प्रथमच पाहण्यात आल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त झाल्या.

वाल्मिकअण्णांकडून कौतुकाची थापयुवा नेते विष्णू चाटे यांच्यासह टीमने केजमध्ये प्रथमच अभुतपूर्व स्वागत सोहळा केला. त्याबद्दल ज्येष्ठ नेते वाल्मिकअण्णा कराड यांनी संयोजकांचे कौतुक केले.