न्यूज ऑफ द डे

बीड पं.स.मध्ये लूट; अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुतासारखे सरळ करणार

By Shubham Khade

July 20, 2023

echo adrotate_group(3);

शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचा इशारा

बीड : तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असताना पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवसैनिकांचा दणका दाखवण्याची वेळ आली असून बोलून, सांगून सुधरत नसतील तर सुतासारखे सरळ करण्याची धमक शिवसैनिकांमध्ये आहे, कदाचित याचा विसर भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना पडला असावा म्हणून पंचायत समिती कार्यालयात शिवसैनिकांचा मोठा ताफा घेऊन लवकरच घुसणार आहे, असे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी सांगितले आहे.echo adrotate_group(6);

बीड तालुका पंचायत समितीत शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीसाठी दहा ते पंधरा हजार रुपये घेतले जातात. विहिर मंजूर झाल्यानंतर मस्टर काढण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये घेतात. फळबाग मस्टर काढण्यासाठी पैशाची मागणी केली जाते. घरकुल कामासाठी व इतर कामे करून देण्यासाठी पैशांची मागणी केली. सर्वसामान्य लोकांची कामे होत नाहीत. या सर्व बाबींचा जवाब विचारण्यासाठी शिवसेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप आपल्या शिवसैनिकांसह लवकरच स्वतः पंचायत समितीमध्ये घुसणार असून अनिल जगताप शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांची झाडाझडती घेणार आहेत. पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या अधिकाऱ्यांनो वेळीच सरळ व्हा, गोर गरीब शेतकरी बांधवांना एकटे समजू नका लक्षात ठेवा शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेनेची ताकद उभी आहे. त्यामुळे कुठल्याही शेतकरी बांधवावर झालेला अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांना विविध कामांसाठी अधिकारी व कर्मचारी पैसे मागतात आणि विनाकारण त्रास देत लूटमार करतात अशा सर्व लोकांना आपल्या मदतीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप 9673789789, तालुकाप्रमुख गोरख सिंघन 9834887257, शहरप्रमुख सुनिल सुरवसे, 9422858787 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन शिवसेनेच्यावतीने करण्यात येत आहे.echo adrotate_group(5); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);