क्राईम

बीडसह परराज्यातील चोरीच्या 22 दुचाकी केल्या जप्त!

By Keshav Kadam

July 31, 2023

बीड दि.31 : बीड जिल्ह्यासह पर राज्यातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांच्या बीड स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. या चोरट्याकडून तब्बल 22 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

गोकुळदास मगर बोरगे, धर्मराज कल्याण बोरागे (रा.बाबुलखुंटा ता. जि बीड) अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षकतुळशीराम जगताप, संजय तुपे, कैलास ठोंबरे, अशोक दुबाले, बाप्पासाहेब घोडके, भागवत शेलार, राहुल शिंदे, नसीर शेख, विक्की सुरवसे, चालक गणेश मराडे, संजय जयभाये यांनी केली.