क्राईम

कोपर्डी हत्या प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेची कारागृहात आत्महत्या

By Shubham Khade

September 10, 2023

पुणे : महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपीने येरवडा कारागृहात आत्महत्या केली आहे. आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील येरवडा कारागृहात आत्महत्या घेत जीवन संपवलं आहे.

आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आरोपी जितेंद्र शिंदे याने स्वत:च्या कपड्यानी गळफास लावून घेतल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी पोहचले आहे. आरोपीचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्याचं शवविच्छेदन करण्यात येईल.

काय आहे नेमकं प्रकरण?अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्य ढवळून निघालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती.