अंबाजोगाई

परळीत बिंगो जुगारावर छापा!

By Keshav Kadam

September 17, 2023

अपर अधीक्षक कविता नेरकरयांच्या पथकाची कारवाई

बीड : परळी शहरामध्ये अवैधरित्या बिंगो जुगार सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना मिळाली. त्यांनी पथकाला पाठवून शनिवारी (दि.16) दोन ठिकाणी छापा मारला. यावेळी 12 जुगाऱ्याना ताब्यात घेत 1 लाख 6 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

परळी शहरातील पेठ मोहल्ला येथील कारवाईतील आजीज इस्माईल शेख, सद्दाम शेख जफार, शेख अफरोज अल्लाउद्दीन, शेख इरफान युसुफ, शेख आरिफ शेख हबीब, आफताब अफजल खान (सर्व रा.परळी) यांना ताब्यात घेतले. व त्यांनतर रेल्वे स्टेशन समोरील कारवाईत संदीप त्रिंबक वाघमारे, मुंजा अशोक शिंदे, विकास साहेबराव जाधव, दिलीप बाबुराव पवार, प्रेमदास ज्ञानोबा पवार, बालाजी शामराव चट्टे असे 12 आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे कारवाई करून पोलीस स्टेशन संभाजीनगर व परळी शहर ठाणे यांच्या ताब्यात दिले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील हवालदार संजय राठोड, पोह.तानाजी तागड, अनिल दौंड, रामेश्वर सुरवसे यांनी केली.