antigen test swab

केजमधील दवाखाना सील; 10 स्वॅब घेतले

केज बीड

केज : तालुक्यातील माळेगाव येथील मयत कोरोनाग्रस्त महिलेने उपचार घेतलेला केजमधील तो दवाखाना सील करण्यात आला आहे. तसेच, डॉक्टरसह 10 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.

माळेगाव येथील कोरोनाग्रस्त महिलेचा औरंगाबाद येथे मृत्यू झाल्याची माहिती आज आरोग्य प्रशासनाने दिली. महिलेने केजमध्ये उपचार घेतलेला दवाखाना सील करण्यात आला आहे. त्या दवाखान्यातील डॉक्टरसह संबंधित महिलेच्या कुटुंबियांचे एकूण 10 स्वॅब आज तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी दिली आहे.

Tagged