बीड

एकनाथ खडसे यांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

By Shubham Khade

October 09, 2023

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अटकेपासून दिलेलं संरक्षण सोमवारी संपलं. त्यामुळे त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.पुणे येथील भोसरी कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात एसीबीने दाखल गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाकडून राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना झटका बसला आहे.

एकनाथ खडसे यांनी पुण्यात त्यांच्या विरोधात एसीबीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली.याप्रकरणी हायकोर्टाने खडसेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण आज (सोमवारी) संपलं. या प्रकरणात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी आणि इतरांचा समावेश आहे.