बीड

चौसाळा परिसरात 25 लाखांचा गुटखा पकडला!

By Keshav Kadam

October 11, 2023

पंकज कुमावत यांच्या पथकाची कारवाई बीड दि.11 : सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने चौसाळा परिसरात अशोक लिलेंड वाहनात 25 लाखांचा गुटखा पकडला. ही कारवाई बुधवारी (दि.11) रात्री 9 च्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कलीम खलील शेख (रा.आझादनगर धारुर,) लायक खलील शेख (रा.धारुर), जावेद उर्फ बब्बू शेख बशीर (रा.मोमीनपुरा, बीड), वाहन मालक शेख माजीद शेख मुक्तार (रा.बीड) अशी आरोपीचे नाव आहेत. सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना अशोक लिलेंड वाहनात गुटखा जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पथकाला पाठवून सापळा रचत चौसाळा परिसरात वाहन पकडले. यावेळी 25 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील उपनिरीक्षक अप्पासाहेब रोकडे, बाहळासाहेब डापकर, दिलीप गित्ते, अनिल मंदे, शेळके, महादेव बहिरवाळ यांनी केली.