बीड

एएसपी कविता नेरकरांची बदलीतर पंकज कुमावत यांची नियुक्ती!

By Keshav Kadam

November 20, 2023

बीड दि.20 ः अंबाजोगाई विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांची पदोन्नतीने मुंबईला सायबर विभागात अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी अपर पोलीस अधीक्षक म्हणून सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत सोमवारी (दि.20) गृहविभागाने आदेश काढले आहेत.

सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे केज उपविभागाचा पदभार होता. मात्र त्यांनी बीड जिल्हाभरात अवैध धंद्यांवर कारवाया करत गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी चांगले काम केले होते. त्यांचा प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण झाला होता. मात्र बदलीत त्यांना पुन्हा बीड जिल्ह्यात संधी मिळाली आहे. पदोन्नतीने त्यांना अंबाजोगाई अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती मिळाली आहे. तर कविता नेरकर यांची मुंबई सायबर विभागात अधीक्षक म्हणूून बदली झाली आहे.