court

बीड

17 संशयित आरोपींना माजलगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन

By Balaji Margude

December 16, 2023

30/10 जाळपोळ प्रकरण ः सुंदर भोसलेच्या जामीनाकडे लागले होते सर्वांचे लक्ष

माजलगाव, दि.16 : माजलगावात घडलेल्या 30/10 च्या जाळपोळ अन् दगडफेक प्रकरणात अटक असलेल्या 17 संशयित आरोपींना माजलगावचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश भास्कर जी. धर्माधिकारी यांनी जामीन मंजूर केला आहे. यातील बहुतांश आरोपी हे 30 ते 45 दिवसांपासून जिल्हा कारागृहात आहेत.

अ‍ॅड. गोले यांची सामाजिकजाणीवेतून विनामुल्य सेवामाजलगाव जाळपोळीतील आरोपींची बाजू मांडण्यासाठी अ‍ॅड. नारायण गोले यांनी सामाजिक जाणीवेतून विनामुल्य न्यायालयीन सेवा दिली. अ‍ॅड. गोले हे अनेक सामाजिक कामात अग्रेसर असतात. शेतकरी प्रश्नावर कायम ते आवाज उठवतात.