MANOJ JARANGE PATIL

बीड

मुंबईच्या आंदोलनासाठी सगळ्यांनी मुंग्यांसारखे घराबाहेर पडा – मनोज जरांगे पाटील

By Balaji Margude

December 27, 2023

छत्रपती संभाजीनगर, दि.27 : मुंबईतल्या आंदोलनाचा मार्ग कसा असेल? ते आम्ही गुरुवारी सांगणार आहोत असं आज मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. हा लढा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळवून देण्यासाठी आहे आणि तो सुरुच राहिल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचे लाखो पुरावे सापडले आहेत. असं असताना आम्हाला त्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या फुफाट्यात कशाला ढकलत आहात? असा प्रश्नही मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. आम्हाला जे आरक्षण दिलं जाईल असं सांगितलं जातं आहे ते टिकणार आहे का? आम्ही ते नाकारलं नाही आम्हाला सगळं मान्य आहे. मात्र सरकारने सांगावं की ते टिकणार का? तसं होणार असेल तर आम्ही ते घ्यायला तयार आहोत असंही मनोज जरांगे पाटील MANOJ JARANGE PATIL यांनी म्हटलं आहे.आमची भूमिका मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं अशी आहे. आमच्या हक्काचं ते आरक्षण आहे आणि आम्हाला ते मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. जे हक्काचं आहे तेच आम्ही मागतो आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. विखे पाटील वगैरे नेत्यांनी आमच्या बद्दल मागून बोलू नये. धरसोड मी नाही तर त्यांनी केली. त्यांनी जिल्ह्याधिकार्‍यांची बैठक घेतली का? हे त्यांना विचारा असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. सरकार म्हणतं आहे की आरक्षण 20 जानेवारीपर्यंत आरक्षण देईल. त्यामुळेच आम्ही आंदोलनाची दिशा ठरवली आहे. जर सरकार 20 तारखेच्या आत आरक्षण देणार असेल तर आम्हाला काहीही हौस नाही मुंबईला जाण्याची असंही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.जी गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे ती हीच आहे की आम्हाला आरक्षण द्या. आम्हाला गोळ्या घातल्या, हाणलं तरीही आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. आता मुंबईत गेल्यावर आम्ही मागे हटणार नाही. सगळी शक्ती, सगळी ताकद पणाला लावायची माझी तयारी आहे. तसं केलं नाही तर आमच्या पोरांचं वाटोळं होणार आहे, त्यामुळे मराठा समाजाला माझी विनंती आहे की त्यांनी आंदोलनासाठी सज्ज व्हा आणि सावध राहा. असं आवाहनही मनोज जरांगेंनी केलं आहे. मुंबईतल्या आंदोलनात मराठे मुंग्यांसारखे बाहेर पडेलेले दिसतील. कुणीही घरी बसू नका. आपण बसून राहिलो तर आपल्या मुलांचे हाल होणार आहेत त्यामुळे मुंबईकडे चला असं आवाहन मी तुमच्या माध्यमातून करतो आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.