india vs china

चीन व भारतीय जवानात झटापट

देश विदेश

नवी दिल्ली : लडाखमधील भारत-चीनसीमेवर सोमवारी रात्री झालेल्या दोन्ही सैन्यांच्या झटापटीमध्ये एका अधिकार्‍यासह तीन भारतीय जवान शहीद झाले होते. मात्र, चीनच्या सैन्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्यूत्तर दिले असून चीनचेही पाच जवान ठार झाले आहेत.

दोन्ही देशांदरम्यान जवळपास पाच दशकांनंतर एवढी गंभीर घटना घडली असून लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी पठाणकोट लष्करी तळाला भेट देण्याचा दौरा रद्द केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सकाळीच परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि लष्करप्रमुख नरवणे यांची बैठक बोलावली होती. सीमेवरील तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी प्रयत्न करत आहेत. यावर चीनने भारतावर गंभीर आरोप केले असून भारतीय सैनिकांनीच दोनदा चीनची हद्द ओलांडल्याचा दावा केला आहे. तसेच भारतीय सैनिकांनीच आधी चीनच्या सैनिकांना आक्रमणासाठी चिथावणी दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान, भारतीय सैन्याने तीन जवान शहीद झाल्याची माहिती दिली. यानंतर चीनलाही जबर नुकसान सोसावे लागले असल्याचे म्हटले होते. आता चीनच्या बाजुने भारतीय जवानांसोबतच्या झटापटीत ठार झालेल्या सैनिकांचा आकडा जाहीर करण्यात आला असून चीनचे 5 जवान ठार झाले आहेत.

Tagged