बीड, दि.15 : मराठा आरक्षणाचा लढा आता तीव्र होण्याची चिन्ह आहेत. मनोज जरांगे MANOJ JARANGE यांनी चलो मुंबई अशी हाक दिल्यानंतर मराठा आंदोलन किमान 20 ते 25 दिवसात मुंबईत पोहोचतील, असा कयास बांधला गेला होता. परंतु मनोज जरांगे यांनी नेहमीप्रमाणे याहीवेळी गनिमी कावा आखत दररोज 90 ते 100 किलोमीटर प्रवास करण्याचे नियोजन केले आहे. कसल्याही परिस्थिती प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी मुंबईत पोहोचायचे असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. गावच्या मराठा समाजाच्या सगळ्यांनी (महिला, मुली, पुरूष, तरुण, वृध्द) यांनी आपल्या गावच्या हद्दीपर्यंत मराठा आंदोलकांसोबत चालायचे आहे. सकाळी नऊ ते दुपारी 12 पर्यंत चालणे आणि तिथून पुढे वाहनाने प्रवास करणे असे वेळापत्रक त्यांनी आज जाहीर केले आहे.
मनोज जरांगे म्हणाले, मोर्चात पुण्यातून जास्त सहभागी होतील. कोटीची संख्या तिथेच पार होणार आहे. यावेळी आम्ही संव्यसेवक घेतले नाही, प्रत्येकाने आपले नियोजन करायचे आहे. ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी त्या मुक्काम स्थळाच्या शेजारी असलेल्या गावकर्यांकडून जेवणाची सोय होणार आहे. दररोज 90-100 ज्ञा चा प्रवास करायचा आहे. ’ज्यांना शक्य आहे त्यांनी चालायचं, इतरांनी गाडीत बसून प्रवास करायचा आहे
पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील मातोरीमध्ये
अंतरवाली ते मुंबई प्रवासातील मुक्कामाचे टप्पे अद्याप ठरवले नव्हते. 20 जाने सकाळी 9 वाजता अंतरवलीमधून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील मातोरीच्या डोंगरपट्ट्यात असणार आहे. प्रत्येक मुक्काम डोंगरात असणार आहे. गावात कोणताही मुक्काम असणर नाही. आपण देवाकडे जात नाही, आपल्या मागण्यांसाठी सरकारकडे जात आहे. त्यामुळे ज्याला जमेल त्याने चालायचे आहे.
पुन्हा अंतरवलीचा प्रयोग करू नका, सरकारला इशारा
मराठा समाज मुंबईला जाणारच, मराठ्यांनी मुंबईला जाण्याची तयारी ठेवा तसेच सर्वांनी मुंबईकडे चला, असे आवाहन मनोज जरांगे यांन केले आहे. दोन्ही मैदानाची परवानगी मागितली आहे, पुन्हा अंतरवलीचा प्रयोग करू नका, असा इशारा पण त्यांनी सरकारला दिला आहे.
असे आहे वेळापत्रक
20 जानेवारी पहिला मुक्काम- बीड तालुक्यातील शिरूर मातोर
21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी (नगर)
22 जानेवारी तिसरा मुक्काम – रांजणगाव (पुणे जिल्हा)
23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास, (पुणे)
24 जानेवारी पाचवा मुक्काम – (लोणावळा)
25 जानेवारी 6 वा मुक्काम – वाशी, (नवी मुंबई)
26 जानेवारी 7 मुक्काम – आझाद मैदान आंदोलन स्थळी
पुण्यात एक कोटी मराठा येणार
पुण्यामध्ये मराठा समाज बांधवाचा आकडा एक करोड होणार आहे. आम्ही पुण्यात दोन दिवस थांबणार आहे. आम्हाला पुणे बघायचे आहे. पुण्यावरुन सर्व प्रकारची वाहने मुंबईकडे जाणार आहे. मुंबई जाणारे प्रत्येकजण आपल्या वस्तू सोबत घेणार आहेत. त्यांनी झोपताना आपल्या वाहनाजवळ झोपायचे आहे. मुंबई जाताना कुणीही व्यसन करायचे नाही. तसेच प्रत्येक जणांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे. ज्यांच्याकडे पाण्याचे टँकर असेल, जनरेटर असेल त्यांनी ते घेऊन यावे, असे आवाहन केले. आंदोलनाला कोणी गालबोट लावत असेल तर त्याला पोलिसांचा ताब्यात देण्याची त्यांनी सांगितले.