बीड

अंमळनेर परिसरात गोळीबार!

By Keshav Kadam

March 18, 2024

पाटोदा दि. 18 : तालुक्यातील अंमळनेर परिसरातील चिखली परिसरात सोमवारी (दि.18) पहाटेच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली असून यामध्ये तीन ते चार जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. घटनास्थळी अंमळनेर पोलिसांनी धाव घेतली असून अधिक तपास करत आहेत. किरकोळ वादातून हा गोळीबार केल्याची माहिती आहे. दरम्यान अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भार्गव सपकाळ यांच्याशी संपर्क केला असता पहाटेची घटना असून जखमींच्या चौकशीनंतर काय प्रकार आहे, ते समोर येईल अशी माहिती दिली. दरम्यान हा गोळीबार अलीम शेख नामक व्यक्तीने केल्याची माहिती आहे.