MANOJ JARANGE AND BAJRANG SONWANE

मनोज जरांगे पाटलांच्या भेटीने बजरंग सोनवणे म्हणाले, भरून पावलो..!

बीड

बीड, दि.28 : सिरस मार्ग येथे नारायणगडावर आयोजित नारळी सप्ताहास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी उपस्थिती लावून आशीर्वाद घेतले. यावेळी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील MANOJ JARANGE PATIL यांच्या भेटीने बजरंग सोनवणे BAJRANG SONWANE आनंदीत झाले. सोनवणेंनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करीत आजचा दिवस भरून पावल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ह.भ. प. विठ्ठल महाराजांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी भविकांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी प्रचाराला गती दिली असून प्रत्येक तालुक्यात दौरे सुरू आहेत. त्यांनी रविवारी तांदळवाडी भिल्ल येथे गहिनीनाथ गडावर नारळी सप्ताह व सिरस मार्ग येथे नारायणगडावर नारळी सप्ताहास उपस्थिती लावली. यावेळी महाराष्ट्राच्या व देशाच्या इतिहासात आंदोलनाचा धगधगता इतिहास देशासमोर ठेवणार्‍या मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीने बजरंग सोनवणे हे आनंदीत झाले. सोनवणे यांनी मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करीत हितगुज केले. त्यांच्या भेटीने आजचा दिवस भरून पावल्याच्या भावना बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केल्या.


या नारळी सप्ताहात ह. भ. प. शिवाजी महाराज व ह.भ.प. विठ्ठल महाराज यांचे आशीर्वाद घेत त्यांनी उपस्थित असलेल्या असंख्य भाविकांशी संवाद साधला. त्याचबरोबर महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार बदामराव पंडित यांच्यासह इंडिया आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

महाश्रमणजी महाराजांचे घेतले शुभाशीर्वाद
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह पेंडगाव येथे जैन धर्मातील तेरापंथचे आचार्य युगप्रधान श्री महाश्रमणजी महाराज यांचे दर्शन घेऊन शुभाशीर्वाद घेतले.