salman khan shootout

सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने केली आत्महत्या

क्राईम न्यूज ऑफ द डे मनोरंजन

Salman Khan | बाॅलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. 14 एप्रिल रोजी पहाटे सलमान खान घरात असताना त्याच्या घराबाहेर फायरिंग झाल्यावर सगळीकडे चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, या प्रकरणी माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तपास सुरु करत अवघ्या काही तासात आरोपींना ताब्यात घेतलं. यामध्ये आरोपी अनुज थापनने आत्महत्या केल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली.

सलमान खानला घाबरवण्यासाठी बिश्नोई गँगने आरोपींना त्याच्या घरावर गोळीबार करायला लावल्याची माहिती आहे. आरोपींना घरावर कमीत कमी दोन मॅगेझिन फायर करण्याचे टार्गेट दिले होते. 2 मॅगेझिन म्हणजेच 12 गोळ्या फायर करा, असा आदेश हल्लेखोरांना देण्यात आला होता.

सलमान खान (Salman Khan) याच्या गॅलेक्सी आपर्टमेंटबाहेर केलेल्या गोळीबारामधील आरोपांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं असता त्यांच्याकडून नवनवीन माहिती मिळत आहे. दरम्यान या प्रकरणातील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटर्सना शस्त्र पुरवल्याचा आरोप अनुजवर आहे. पोलिसांनी अनुजला ताब्यात घेताच अनुजने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनूसार अनुजने शूटर्सला फायरिंगचे शस्त्र पुरवल्याचं म्हटलं आहे. मात्र, पोलिसांनी तपास केल्यानंतर यामध्ये अनुजचा समावेश असल्याचं समोर आलं. पोलिसांनी अनुजला ताब्यात घेत त्याला अटक केली. अनुजने आज (1 मे) रोजी पोलिस कोठडीमध्ये गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांना याबदल समजातच त्यांनी अनुजला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

Tagged